पिंपरी: शहर सुधारणेसाठी हवेत समितीसदस्यांना अधिकारात वाढ

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन) - पिंपरी - चिंचवड महापालिकेतील शहर सुधारणा समितीच्या सदस्यांना आपल्या अधिकारात वाढ करुन हवी आहे .अधिकारात वाढ करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांनी राज्यातील इतर महापालिकां मधील शहर सुधारणा समितीच्या अधिकाराची माहिती घ्यावी . त्याचा अहवाल सभेला सादर करण्यात यावा , असा ठराव समितीच्या सभेत करण्यात आला आहे. 

पिंपरी महापालिकेत सात समित्या आहेत . त्यामध्ये स्थायी समिती , विधी समिती , महिला व बालकल्याण समिती , शहर सुधारणा समिती , क्रीडा , कला , साहित्य व सांस्कृतिक समिती , शिक्षण समिती आणि जैवविविधता व्यवस्थापन समिती अशा सात समित्या आहेत . त्यामध्ये सर्वाधिक अधिकार स्थायी समितीला असून स्थायी समिती शक्तीशाली समिती आहे . महापालिकेच्या आर्थिकचाव्या या समितीच्या हातात असतात . इतर समित्यांना अधिकार कमी आहेत . विषय समित्यांना अधिकार होते . पंरतु , ते अधिकार महासभेने कमी केले होते . समित्यांना अधिकार नसल्यामुळे सदस्यांना महत्वाची कामे करता येत नाहीत . त्यामुळे सातत्याने विविध विषय समित्यांच्या सदस्यांकडून अधिकारात वाढ करुन देण्याची मागणी केली जात आहे , शहर सुधारणा समितीचे अधिकार सर्वसाधारण सभेने कमी केले आहेत . त्यामुळे समितीच्या अधिकारात वाढ करण्यात यावी , यासाठी सहाय्यक आयुक्त यांनी इतर महापालिकांमधील शहर सुधारणा समितीच्या अधिकाराबाबतची माहिती घ्यावी . त्यांना कोणते अधिकार आहेत . याचा अहवाल महिन्याभरात समितीपुढे सादर करावा , असे समितीने आयत्यावेळी सदस्यप्रस्तावाद्वारे केलेल्या ठरावात म्हटले आहे .

Review