कासारवाडीत पुणे-मुंबई रस्त्यावरील मेट्रोची क्रेन कोसळली

पिंपरी (सह्याद्री बुलेटीन) – पुणे महामेट्रोकडून पिंपरी ते स्वारगेट मेट्रोचे काम वेगात सुरु आहे. मेट्रोचे पिलर उभे करताना आज (शनिवारी) अचानक दुपारी अडीचच्या सुमारास क्रेन रस्त्यावर कोसळली. अचानक घडलेल्या घटनेमुळे मेट्रोने नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुण्याहून पिंपरीकडे येणा-या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अचानक घडलेल्या अपघातामुळे अद्यापही जिवितहानीबाबत काहीच माहिती मिळालेली नाही.

Review