९२.व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्घाटनाचे नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द
यवतमाळ,(सह्याद्री बुलेटीन)- ९२.व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यासाठी आयोजकांनी ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवलेले निमंत्रण अचानक रद्द केले आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे हे निमंत्रण रद्द करण्यात आल्याचे पत्र आयोजकांनी त्यांना पाठविले आहे. यामुळे साहित्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, त्यांच्या भाषणाने वाद निर्माण होण्याच्या भीतीपोटी हे पाऊल संमेलन आयोजकांनी उचलल्याची चर्चा आहे.