सहा जणांनी लोखंडी रॉडने तरुणाला केली मारहाण

 भोसरी,(सह्याद्री बुलेटीन)- सहा जणांच्या टोळक्याने तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण केली .यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला .ही घटना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास भोसरी मधील गवळीनगर येथे घडली .प्रणव बाळासाहेब गवळी ( वय 19 , रा . भवानी ट्रेडर्स समोर , गवळीनगर , भोसरी ) या तरुणाने याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली .त्यानुसार मंगेश मोरे ( वय 21 , रा . गव्हाणे पेट्रोल पंपामागे) आणि अन्य पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी प्रणव रविवारी दुपारी दीडच्या सुमारास गवळीनगर येथे त्याच्या आतेबहिणीच्या मैत्रिणीसोबत बोलत थांबला होता .त्यावेळी आरोपी त्याच्या पाच साथीदारांसोबत तिथे आला .त्याने लोखंडी रॉड आणि बांबूने प्रणव याला मारहाण केली .यामध्ये प्रणवच्या हाताला , डोक्याला व चेह - यावर इजा झाली .यावरून सहा जणांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .भोसरी पोलीस तपास करीत आहेत .

Review