मंत्रालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, संरक्षक जाळीमुळे जीव वाचला
मुंबई,(सह्याद्री बुलेटीन)- मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन या तरुणाने उडी मारली, मात्र सुदैवाने खाली लावलेल्या संरक्षक जाळ्यांमध्ये हा तरुण अडकला आणि त्याचे प्राण बचावले.दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. लक्ष्मण चव्हाण असे उडी मारणाऱ्या तरुणाचे नाव असल्याची माहिती असून तो प्रजासत्ताक भारत पक्षाचा कार्यकर्ता असल्याचं समजतंय. या घटनेमुळे मंत्रालयात काही वेळासाठी गोंधळाचं वातावरण होतं, पण थोड्याच वेळात अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांच्या मदतीनं या तरुणाला जाळीवरुन सुरक्षित खाली उतरवण्यात आलं आहे. सध्या त्याच्याकडे चौकशी केली जात आहे. दरम्यान या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत अद्याप नेमकी माहिती मिळालेली नाही.