प्रजासत्ताक दिनानिमित्त मगर स्टेडीयमवर- शालेय विद्यार्थ्यांचा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम
पिंपरी,(सह्यद्री बुलेटीन) - पिंपरी - चिंचवड महापालिकेतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांचा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे . नेहरूनगर येथील कै .अण्णासाहेब मगर स्टेडीयमवर हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला सतरा लाख रुपये खर्च येणार आहे . त्याला स्थायी समितीच्या सभेत आयत्यावेळी मान्यता देण्यात आली .
पिंपरी - चिंचवड महापालिका क्रीडा विभाग , शिक्षण विभाग आणि माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे . प्रथमच होणा - या या कार्यक्रमामध्ये महापालिकेच्या प्राथमिकच्या १०५ आणि माध्यमिकच्या १८ शाळांमधून प्रत्येकी ५० विद्यार्थी याप्रमाणे ६ हजार १५० विद्यार्थी सहभागी होणार आहेत . या कार्यक्रमात सहभागी होणा - या या विद्याथ्र्यांना त्यांच्या शाळेतून पीएमपीएल बसद्वारे आणणे आणि पुन्हा नेऊन सोडणे ही व्यवस्था करण्यात येणार आहे . त्यासाठी दोन शाळांमध्ये एका बसची व्यवस्था करण्यात येणार आहे . यासाठी १२३ बसना प्रत्येकी ८ हजार रुपये प्रमाणे ९ लाख ८४ हजार रुपये इतका खर्च येणार आहे .
या सर्व विद्याथ्र्यांना प्रत्येकी एक गुड ई बिस्कीट पुडा , एक लहान पाण्याची बाटली , दोन केळी आणि एक लहान एनर्जी डिंक्स देण्यात येणार आहे . त्यासाठी ३ लाख 91 हजार 200 रुपये खर्च करण्यात येणार आहे . या कार्यक्रमासाठी येणा - या अंदाजे ५० पाहूणे , पदाधिकारी , अधिकारी यांचा सत्कार कुंड्यांसह रोप किंवा पुस्तके देऊन करण्यात येणार आहे . त्याचबरोबर या सर्वांना चहापान , बिस्लेरी पाण्याची व्यवस्था आणि अल्पोपाहारही देण्यात येणार आहे . त्यासाठी २० हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे . या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी फ्लेक्स , बॅनर छपाई करण्यात येणार आहे . त्यासाठी ३ लाख रुपये इतका खर्च येणार आहे .
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने १० हजार रुपये आकस्मिक खर्च धरून एकुण १७ लाख ५ हजार रुपये इतका खर्च या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमासाठी येणार आहे . महापालिका क्रीडा विभागाच्या खेळाडू दत्तक योजना या लेखाशिर्षावर एक कोटी 30 लाख रुपयांची तरतूद करण्यात आहे.
या कार्यक्रमाच्या आकस्मिक धरून एकूण १७ लाख ५ हजार रुपये इतका खर्च या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमासाठी येणार आहे .महापालिका क्रीडा विभागाच्या खेळाडू दत्तक योजना या लेखाशिर्षावर एक कोटी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे .त्यातून १८ लाख रुपयांचा खर्च ‘ सांस्कृतिक कार्यक्रम ' यासाठी वर्ग करण्यात येणार असून देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचा खर्च त्यातून करण्यात येणार आहे .या व्यतिरिक्त या कार्यक्रमासाठी आवश्यक स्टेज , टेबल , खुच्र्यो , मैदानावर टाकण्यात येणारे मॅट याचा खर्च महापालिका ' ब ' प्रभागाच्या स्थापत्य विभागाकडून , तर जनरेअरसह विद्युत माईक , स्पीकर व्यवस्था , एलईडी स्क्रीन आदींचा खर्च विद्युत विभागाकडून करण्यात येणार आहे .