मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांपूर्वीच मारुती भापकरांना ठेवले नजरकैदेत

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना पोलीसांनी नजरकैदत ठेवले आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहराच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे उद्घाटन आणि प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे विविध प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून यावेळी प्रेक्षागृहाबाहेर मारुती भापकर जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करणार होते. मात्र सकाळीच पोलीस भापकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून त्यांना स्थानबध्द केले आहे.

Review