पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे - मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- पिंपरी चिंचवड शहराच्या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. चिंचवड मधील प्रेमलोक पार्क येथील पालिकेच्या इमारतीत १५ ऑगस्टला पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. या इमारतीला उद्घाटनाची गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा होती. सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश आले आहे.

यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट, समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे, पोलीस महासंचालक दत्ता पडसळगीकर, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबकस्वार, महापौर राहुल जाधव, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम पोलीसांना मानवंदना देऊन इमारतीचे उद्घाटन केले. त्यानंतर संपूर्ण पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीची पाहणी केली. नवीन पोलीस आयुक्तालयाला लागणाऱ्या सर्व त्या आवश्यक सुविधा पुरविल्या जातील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. शहरातील कायदा सुवस्था राखण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

Review