जाणता राजा प्रतिष्ठानतर्फे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा साजरा

चिंचवड,(सह्याद्री बुलेटीन)-जाणता राजा प्रतिष्ठान च्या वतीने साजरा करण्यात येणारा छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली येथे उत्साहात पार पडला, यावेळी पिंपरी चिंचवड भागातील शिव शंभू प्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यानातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीला दह्या दुधाने अभिषेक करण्यात आला तसेच मूर्तीच्या परिसरात स्वछता करण्यात आली. उद्योजक सचिन आहेर यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

स्वराज्याचे दुसरे छत्रपती क्षात्रवीर संभाजी महाराज यांचा इतिहास आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असून शंभुराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने युवकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शंभुराज्याभिषेक सोहळ्याचे समन्वयक समाधान पाटील यांनी सांगितले. यावेळी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक विकास आहेर, अध्यक्ष अजिंक्य आहेर, अंगद गायकवाड, सोन्या आहेर, बाळू गायगोळ , खंडू गुरव, पंकज कडू, अमोल कळंब, राजा सिंग,आकाश राक्षे तसेच सर्व सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप रुपेश कोकाटे यांनी केला.

Review