पुण्याच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या जलसंपदा अधिकाऱ्यांसाेबत महापाैरांची चर्चा
पुणे,(सह्याद्री बुलेटीन)- काेणतीही पूर्वसुचना न देता जलसंपदा विभागाकडून बुधवारी दुपारी शहराचा पाणी पुरवठा बंद केलाने त्याचे तीव्र पडसाद उमटले.पाटबंधारे विभागाचे अधिकारी मुख्यमंत्र्यांनी सांगून देखील ऐकत नसतील तर त्या मुजाेर अधिकाऱ्यांना मुक्ता टिळक या जाब विचारण्यासाठी आज सिंचनभवन येथे त्यांनी भेट घेणार हाेत्या. तसेच पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांना शहरामध्ये फिरकू देणार नाही, असा इशाराही टिळक यांनी दिला हाेता.
महापालिका कालवा समिती व जलसंपदा नियमन प्राधिकरणाच्या निर्णयाचा दाखला देत जलसंपदा विभागाने गेल्या काही दिवसांत तीन वेळा अचानक शहराचा पाणी पुरवठा बंद केला आहे. शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक असून, शहरात पाणी कपात करण्यात येऊ नये अशी मागणी महापौर मुक्ता टिळक यांच्यासह भाजपच्या सर्व पदाधिका-यांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. पुणे दौ-यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करू नये असे थेट आदेश जलसंपदा विभागाच्या सचिवांना दिले होते. त्यानंतर देखील पुण्यातील जलसंपदा विभागाचा मनमानी कारभार सुरुच असून, बुधवारी (दि.१६) दुपारी पर्वती पंपिंग स्टेशनचा पाणी पुरवठा अचानक बंद केला. यामुळे महापौर मुक्ता टिळक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी प्रचंड संतप्त झाले. महापौर मुक्ता टिळक यांनी याप्रकरणी जलसंपदा मंत्री यांच्याशी संपर्क साधून पाणी पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी केली आहे.