‘गौरी सजावट’ स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- रहाटणीतील बळीराज महिला प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित गौरी सजावट स्पर्धेतील विजेत्या महिलांना अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन नगरसेविका सविता खुळे यांनी केले होते.
रहाटणी येथील बळीराज मंगल कार्यालय येथे गुरूवारी हा कार्यक्रम संपन्न झाला. चिंचवड आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी नगरसेविका सुनिता तापकीर, निता पाडाळे, उषा मुंढे, निर्मला कुटे, स्विकृत नगरसेवक विनोद तापकीर, गोपाळ माळेकर आदी उपस्थित होते.
यावेळी होम मिनिस्टर या स्पर्धेतील पहिल्या विजेत्या पाच महिलांना अश्विनी जगताप यांच्या हस्ते आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येक सहभागी महिलांना विशेष बक्षिसे देण्यात आली. तसेच गौरी सजावट स्पर्धेतील पहिल्या विजेत्या पाच महिलांना घरगुती उपयोगी वस्तू बक्षिस स्वरूपात देण्यात आल्या. या स्पर्धेतील प्रत्येक सहभागी महिलांना आकर्षक बक्षिसांचे वाटप यावेळी करण्यात आले.
अश्विनी जगताप यांनी उपस्थित महिलांना बचत गटांविषयी मार्गदर्शन केले. महिला सक्षम होणे किती महत्वाचे आहे हे देखील पटवून दिले. सविता खुळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.