मुळशीची सुवर्णकन्या वैष्णवी मांडेकर चा जागतिक विश्वविक्रम ‘लिम्का बुक’ रेकॉर्डमध्ये नोंद

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- जागतिक महिला दिनानिमित्त पुण्यातील नेहरू मेमोरिअल हॉल येथे नुकत्याच एका विक्रमाची नोंद झाली. मुळशीची सुवर्णकन्या म्हणून ओळख असणाऱ्या वैष्णवी दादाराम मांडेकर हिने आपल्या सहमैत्रीण अस्मिता जोशी समवेत ६ इंचाच्या खिळ्यांच्या फळीमध्ये झोपून अंगावर १ हजार किलो वजनाच्या शहाबादी फरशा अवघ्या ५ मिनिटे २४ सेकंदात फोडल्या.. वैष्णवीने ही कामगिरी करत स्वत:चा जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित केला. तिच्या या दैदिप्यमान कामगिरीची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे. नँशनल कराटे चँम्पियन असलेली वैष्णवी यापूर्वी देखील अनेक पुरस्कारांची मानकरी ठरली आहे. तिच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

 

Review