धनंजय मुंडेंनी हॅकिंगचं राजकारण करू पाहतायत - प्रकाश महाजन
मुंबई,(सह्याद्री बुलेटीन) - गेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक करण्यात आल्याची माहिती असल्यानंच भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा दावा एका सायबर तज्ज्ञानं केला आहे. या खळबळजनक दाव्यामुळे देशातलं राजकारण ढवळून निघालं आहे.
या प्रकरणाची चौकशी रॉ किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली आहे. मात्र धनंजय मुंडे हॅकिंग प्रकरणाचं केवळ राजकारण करू पाहतायत असे गोपीनाथ मुंडे यांचे मेव्हणे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे. तसेच गोपीनाथ मुंडे यांचा हॅकिंगसारख्या बाष्कळ गोष्टींवर विश्वास नव्हता असे ही त्यांनी म्हटले आहे.