
Republic Day:राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न,भारताच्या लष्करी सामर्थ्याचं दर्शन जगाला घडवलं.
दिल्ली,(सह्याद्री बुलेटीन) देशभरात ७० वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असून दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यानंतर भारताच्या लष्करी सामर्थ्य आणि संस्कृतीची झलकच राजपथावर अनुभवायला मिळाली. या सोहळ्यात दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा हे प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
देशभरात ७० वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असून राजधानी दिल्लीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दिल्लीत विजय चौक येथून संचलनाला सुरुवात झाली. राजपथ, टिळक मार्ग, बहादूर शाह झफर मार्ग,नेताजी सुभाष मार्ग मार्गे लाल किल्ला येथे परेडची सांगता झाली. सुमारे ९० मिनिटांचा हा शानदार सोहळा होता. यात २२ राज्यांचे चित्ररथ आणि केंद्र सरकारच्या विविध विभागांचे चित्ररथ सहभागी झाले होते.