खासदार निलेश राणे यांच्या विरोधात-वाकड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- खासदार निलेश राणे यांनी एका टिव्ही न्यूज चँनेलवर नुकतीच प्रतिक्रीया देली. यावेळी राणे यांनी शिवसैनिकांबद्दल अपशब्दाचा वापर केला. त्याविरोधात शिवसेनेचे युवराज दाखले यांनी खासदार निलेश राणे यांच्याविरोधात कलम १५५ फौजदारी दंड सहीत भादवी कलम ५०० प्रमाणे वाकड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
यावेळी शिवशाही व्यापारी संघ प्रदेश सचिव गणेश आहेर, गोरख पाटील, नवनाथ जाधव, रविकिरण घटकार, बाळासाहेब गायकवाड, मारूती मस्के, रोहीदास तांबे, दत्ता गिरी, गणेश पाडुळे, आशिष वाळके, भाग्यश्री मस्के, सारीका ताम्हचिकर, सुनिता खंडाळकर, विशाल बाविस्कर, दिपक कांबळे, प्रदिप दळवी तसेच शिवशाही व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.