सेईको काई कराटे इंटरनॅशनल इंडिया पुणे तर्फे दि. 9 आणि 10 मार्च 2019 रोजी पुणे ओपन आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन

पुणे,(सह्याद्री बुलेटीन)- सेईको काई कराटे इंटरनॅशनल इंडिया पुणे तर्फे दिनांक 9 व 10 मार्च 2019 रोजी पुणे ओपन या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा महाराष्ट्राचे कुलदैवत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करण्यात येत आहे हे स्पर्धा शिवछत्रपती आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल येथे घेण्यात येणार आहे.

या आंतरराष्ट्रीय स्पर्धे मध्ये 15 ते 20 देशांचे जवळ पास 2000 स्पर्धक आणि भारतीय सेना दल, निम लष्करी  दल जसे सी.आर.पी.एफ., आय.टी. बी.पी., आसाम रायफल्स चे स्पर्धक भाग घेणार आहेत.ही स्पर्धा जागतिक कराटे महासंघाच्या नियम व अटी नुसार पार पडली जाईल,ही स्पर्धा कराटे असोसिएशन ऑफ इंडिया च्या मान्यतेने होत आहे.

या स्पर्धेचे पंच म्हणून जागतिक महासंघाचे व आशिया महासंघाचे पंच काम करणार आहेत.या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कराटे असोसिएशन ऑफ इंडिया चे मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.ही स्पर्धा म्हणजे देशातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी स्पर्धा करण्यासाठी एक मानाचे व्यासपीठ ठरणार आहे.आणि या स्पर्धे मुळे देशातील व परदेशातील खेळाडूंना आपले कराटे चे कौशल्य प्रदर्शित करण्याची एक सुवर्ण संधी मिळणार आहे.

या स्पर्धेच्या वैयक्तिक खुल्या गटातील प्रथम क्रमांकास ब्रॅण्डेड लॅपटॉप,सुवर्ण पदक व प्रमाणपत्र पारितोषिक म्हणून देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. खुल्या गटातील सांघिक विजेत्या संघाना 1,00,000 रुपयाचे भव्य रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविले जाणार आहे.

पुणे ओपन आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा 2019 ही महाराष्ट्राच्या कराटे इतिहासातिल मैलाचा दगड ठरणार आहे या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कराटे असोसिएशन ऑफ इंडिया चे वरिष्ठ उपाध्यक्ष हांशी भरत शर्मा,सचिव आंबेडकर गुप्ता,महाराष्ट्र कराटे संघटनेचे अध्यक्ष शिहान विराफ वातचा उपस्थित राहणार आहे.

या स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी आहे तरी इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेण्यासाठी खलील क्रमांकावर संपर्क साधावा.अविनाश चंदनशिवे-+919657975402,-रवींद्र सूर्यवंशी-+919822201629

Review