पोलीस खात्याला गणपतराव माडगुळकर यांच्यासारख्या अधिका-यांची गरज - आमदार बाळा भेगडे

वाकड,(सह्याद्री बुलेटीन) - समाजात काम करत असताना गरीब असो की श्रीमंत सर्वांना योग्य न्याय देण्याचे काम मोठे असते. ते काम नेहमीच योग्यरित्या बाजावण्याचे काम सहाय्यक पोलीस आयुक्त गणपतराव माडगूळकर यांनी केले आहे. प्रत्येक वेळी त्यांनी न्यायची बाजू घेत काम केले आहे. त्यामुळेच समाजात त्यांच्या विषयी आपुलकी आहे. पोलीस खात्याला अशा अधिकाऱ्यांची गरज असल्याचे मत आमदार बाळा उर्फ संजय भेगडे यांनी वाकड येथे व्यक्त केले.

पोलीस खात्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल २६ जानेवारी रोजी राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले. त्यांना मिळालेल्या या पदकाबद्दल त्यांचा वाकड येथे सपत्नीक नागरी सत्कार आमदार भेगडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महापौर राहुल जाधव होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बिल्डर असोसिएशन नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष संग्राम पाटील, बांधकाम व्यवसायिक सुरेश पाटील, संत तुकाराम साखर कारखान्याच्या संचालिका कुंदाताई विनोदे, रमेश लोकरे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ आदी उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने प्रतिष्ठीत मान्यवर, नागरिक, येलमार समाज बांधव उपस्थित होते.

राष्ट्रपती पदक विजेते माडगूळकर यांना शाल, हार, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि विठ्ठलाची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले.

महापौर जाधव म्हणाले, "समाजातील पीडित वर्ग प्रथम देव आणि त्यानंतर पोलिसांकडे जातो. त्यामुळे अश्या पीडितांना न्याय देण्याचे काम करणाऱ्या पोलिसांना नेहमीच चांगले आशीर्वाद मिळतात. अश्याच पध्द्तीने काम करणाऱ्या माडगूळकर यांचा सरकारने सन्मान केला आहे."

पुरस्काराला उत्तर देताना माडगूळकर म्हणाले, "मी माझ्या कामामध्ये कधीही दुजाभाव केला नाही, सर्वाना योग्य कायदेशीर न्याय देण्याचे काम केले. सहकाऱ्यांच्या अडी अडचणी समजून काम केले. गुन्हेगारांना कधीच थारा दिला नाही. या कामाची दखल घेतल्याने राष्ट्रपती पदक मिळाले. आपण केलेल्या गौरवामुळे मी खरच भावुक झालो आहे."

कार्यक्रमाचे संयोजन संपत बळवंत विनोदे, भरत जालिंदर आल्हाट, अमोल येलमार, तुकाराम ऊर्फ बाळासाहेब निवृत्ती विनोदे, रंगनाथआण्णा दगडोबा हुलावळे, संजय ज्ञानदेव जगताप, राजु करपे आदींनी केले.

Review