अण्णांना काहीही झाल्यास याला सरकार जबाबदार राहील - धनंजय मुंडे
पुणे,(सह्याद्री बुलेटीन)- जनलोकपाल, लोकायुक्त, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मागील चार दिवसांपासून उपोषण करीत आहेत.मात्र सरकारकडून अद्याप याची दखल घेण्यात आलेली नाही. दिवसेंदिवस अण्णांची तब्येत खालवत आहे. अण्णांना काहीही झाल्यास सरकार जबाबदार राहील असे विधान राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांनी केले आहे.
धनंजय मुंडे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून अण्णा हजारे यांच्याबदल ट्टिट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'समाजासाठी आपले जीवन वेचणाऱ्या अण्णा हजारे यांना हे सरकार झुलवत आहे. आण्णांची तब्येत जलदगतीने खालवतेय. सरकारने आण्णांनी केलेल्या लोकहिताच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात. अण्णांना काहीही झाल्यास सरकार जबाबदार राहील'.