अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या रचनेत होणार मोठा बदल?

मुंबई,(सह्याद्री बुलेटीन) – अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या बहुचर्चित शिवस्मारकाचे बांधकाम होण्यापूर्वी शिवस्मारकाच्या रचनेत मोठा बदल केला जाण्याची शक्यता आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याप्रमाणे उभा पुतळा तयार करण्याचा विचार शिवस्मारक समितीकडून सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा 153 मीटर उंचीचा असू शकतो अशी चर्चा होती.

दरम्यान, शिवस्मारकाच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे सध्या शिवस्मारकाचं काम बंद आहे. यापूर्वी या स्मारकाच्या रचनेत मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती तसेच शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असू शकतो, अशी चर्चा होती तसेच पर्यटकांना शिवस्मारक पाहता यावं, यासाठी 180 मीटर उंचीवर जाणारी लिफ्ट असेल. शिवस्मारकासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळ अरबी समुद्रात 16 एकर जमीन निवडली आहे. हे स्मारक सुमारे 309 फूट उंच असेल, समुद्रात तीन एकर क्षेत्रावर भर घालून चबुतरा उभारण्यात येणार आहे, मात्र या रचनेत शिवस्मारक समितीकडून बदल केला जाण्याची शक्यता आहे.

Review