एमआयएम पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी अकील मुजावर यांची नियुक्ती
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- एमआयएम पक्षाचे पिंपरी चिंचवडचे माजी शहराध्यक्ष अकील मुजावर यांची एमआयएम पश्चिम महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
28 जानेवारी रोजी पिंपरीत पार पडलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या महाअधिवेशनात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि आमदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत मुजावर यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.