नवी सांगवीतील ऋतूजा जोगदंड हिची विभागीय स्पर्धेसाठी निवड
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)– अखिल भारतीय आंतर विद्यापीठ नेटबॅाल स्पर्धेसाठी मॅार्डन महाविद्यालयाची नवी सांगवीतील ऋतूजा जोगदंड हिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
हे निवडीचे पत्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने विविध महाविद्यालयाच्या प्राचार्य यांना देण्यात आली. यावेळी राज्यातील विविध महाविद्यालयातून 12 विद्यार्थ्यांनीची निवड करण्यात आली. आकुर्डी येथील प्रा रामकृष्ण मोरे महाविद्यालयाची विशाखा पलांडे या विद्यार्थिनीची या संघात निवड झाली आहे.
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ नेटबॅाल विभागीय स्पर्धा चेन्नईत 25 ते 28 फेब्रुवारीला होणार आहेत. ऋतुजा जोगदंड ही आता विभागीय स्पर्धेला खेळणार आहे. तिची निवड झाल्याने प्राचार्य डॉ. राजेंद्र झुझाराव आणि मानवी हक्क संरक्षण व जाग्रतीचे शहराध्यक्ष आन्ना जोगदंड, राष्ट्रीय अध्यक्ष विकास कूचेकर यांनी अभिनंदन केले आहे. तिला क्रिडा शिक्षक विक्रम फाले यांचे मार्गदर्शन मिळाले.