पुणे -'जेईई मेन'ची दुसरी ऑनलाइन परीक्षा ७ ते २० एप्रिलदरम्यान होणार

पुणे,(सह्याद्री बुलेटीन) – देशातील आयआयटी, एनआयटी, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली 'जेईई मेन'ची दुसरी ऑनलाइन परीक्षा ७ ते २० एप्रिलदरम्यान होणार आहे. त्यासाठी ८ फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे.

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी जेईई परीक्षा अनिवार्य आहे. 'जेईई मेन' परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जानेवारीत झालेल्या पहिल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यानंतर दुसऱ्या परीक्षेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. नोंदणीसाठी शेवटची मुदत दि. ७ मार्चपर्यंत राहील. ही परीक्षा राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या (एनटीए) वतीने घेण्यात येत आहे.

पहिल्या जेईई मेन परीक्षेस बसता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या जेईई मेन परीक्षेत बसण्याची संधी मिळणार आहे. पेपर १ व पेपर २ अशी दोन्ही पेपर ऑनलाइन पद्धतीने होतील. त्यासाठी प्रथम: नोंदणी करणे आवश्‍यक असून, ही नोंदणी एनटीए अथवा जेईई मेनच्या संकेतस्थळावरून करणे आवश्‍यक आहे.

Review