लोकसभेच्या ४८ जागा लढायलाही आम्ही तयार; मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला पुन्हा इशारा

पुणे,(सह्याद्री बुलेटीन) - भाजप आणि शिवसेनेतील युतीवरून रस्सीखेच सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४८ जागा लढण्यास आम्ही तयार असल्याचे सांगत पुन्हा शिवसेनेला इशारा दिला आहे.

पुण्यामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र आघाडीवर असेल. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या तिन्ही जागा जिंकायच्या आहेत. पुन्हा काँग्रेसचा उमेदवार निवडून आल्यास मोठी चूक असले. मागीलवेळी भाजपचे ४२ खासदार निवडून आले. येत्या निवडणुकीत ४३ खासदार निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. निवडून येणारा खासदार हा बारामतीतून असेल असेही त्यांनी सांगितले. काँग्रेस सरकारने कोणतीच कामे केली नाहीत. प्रत्येक कामात केवळ दिवस ढकलला मात्र, नरेंद्र मोदी यांनी एक दिवस ही गप्प न राहता काम करीत आहेत.

Review