सलमान खान पुन्हा एकदा साकारणार गुप्तहेराच्या भूमिकेत ?
बॉलिवूड स्टार सलमान खान सध्या आपला आगामी चित्रपट भारतच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अब्बास अली करणार आहेत. त्यातच सलमानकडे आणखी एक चित्रपट आला आहे. ज्यामध्ये त्याला गुप्तहेराची भूमिका साकारायची आहे.
हा चित्रपट एका कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे. सलमानला साउथ कोरियाचा सुपरहिट चित्रपट वेटरनच्या रिमेकमध्ये काम कऱण्याची ऑफर आली आहे. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी रिल लाईफ प्रोडक्शनने अधिकार विकत घेतले आहे. वेटरनला रू सिंयग वांगने दिग्दर्शित केले आहे.