ईओएन फिटनेस एम्पायर आयोजित फिटनेस जण जागृती
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन) दि.१० शिवनेरी आपले शहर आणि देश सर्वात आरोग्यपूर्ण आणि तंदरुस्त शहर बनावे, अशा तीव्र इच्छेने ईओएन फिटनेस एम्पायर आयोजित फिटनेस जण जागृती अभिनयांतर्गत सामाजिक संदेश देण्याचे कार्यरत आहे.प्रत्येक महिन्यात साप्ताहिक सुट्टीत दोन वेळा शिवनेरीला ट्रॅकिंग करून,फिटनेस संदर्भात जण जागृती करणे तसेच गडकिल्ल्याचे संवर्धन करणे,चढाई, भटकंती, श्रमदान यामुळे आरोग्याला उत्तम स्वास्थ्य लाभते.
सर्व जिमच्या माध्यमातून एक व्यायामाबाबत सल्ला व मार्गदर्शन, आहाराशी संबंधितमाहिती, समुपदेशन, मार्गदर्शन करणे . आरोग्य आणि स्वास्थ्य यासाठी सर्व नागरिकांना प्रेरणा देण्याचेलक्ष ठेवून. ईओएन फिटनेस एम्पायर कार्यरत आहे. शहराला आणि देशातील सर्वात तंदरुस्त बनविणे हे ध्येय ईओएन फिटनेस एम्पायर चा नवीन उपक्रम सुरु केले आहे,असे ईओएन फिटनेस एम्पायर चे आयोजक सागर गोदमगावे यांनी सांगितले