फुले महाविद्यालयातील प्रदर्शनाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित शॉर्ट टर्म कोर्सेस व विज्ञान प्रदर्शनाचे उद्धाटन मंगळवारी (दि.12) सकाळी अकरा वाजता रयत शिक्षण संस्थेचे अॉडिटर तथा प्राचार्य डॉ. अरूण आंधळे यांच्या हस्ते झाले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष समीर मासुळकर, तसेच प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
प्रदर्शनात जर्नालिझम, फँशन डिझाईन, व्यक्तिमत्व विकास, फोटोग्राफी, फ्रेंन्च लँगवेझ, ट्रव्हल अँन्ड टुरिझम, कौशल विकास, जिओग्रॉफी, डीटीपी, भोगोलिक माहिती प्रणाली, स्पोकन इंग्लिश, ब्युटी पार्लर, सेल्फ एम्प्लॉयमेंट, इन्शुरन्स यासह विविध 36 स्टॉल प्रदर्शनास विद्यार्थ्यांनी मांडले होते. महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर व्यावसायिक, रोजगार पुरक आणि कौशल्य विकासावर आधारीत कोर्सेस महाविद्यालयाकडून चालविले जातात. प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो.