पार्थ पवारांकडून पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीने केलेल्या कामांची पाहणी दौºयांतर्गत आणि विद्यार्थ्यांशी संवादही साधला

पार्थ पवारांकडून पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीने केलेल्या कामांची पाहणी दौºयांतर्गत आणि विद्यार्थ्यांशी संवादही साधला

पिंपरी,सह्याद्री बुलेटीन 0)- पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची पंधरा वर्ष सत्ता होती. त्या सत्तेच्या कार्यकाळात शहरात झालेली विकास कामे पाहण्यासाठी आज (दि.११) दिवसभर मावळ लोकसभेचे संभाव्य उमेदवार पार्थ पवार यांनी फेरफटका मारला. शहराला पाणी पुरवठा करणारे निगडीतील जलशुध्दीकरण केंद्र, दुर्गादेवी टेकडी यासह विविध ठिकाणी भेटी देवून शहराची पाहणी केली. त्याच शिवाय संत तुकाराम नगरमधील एका टपरीवर थांबून चहा आस्वाद घेत त्यांनी तेथील गावाहून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शहराची माहिती जाणून घेत संवादही साधला. त्याच्यासमेवत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक राजू मिसाळ, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे उपस्थित होते.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय कारर्किदीची मुहूर्तमेढ पिंपरी चिंचवडमध्ये रोवली गेली होती. त्यांना पिंपरी चिंचवडकरांनी १९९१ मध्ये खासदार म्हणून निवडून दिले. त्यानंतर त्यांनी मागे फिरुन पाहिलेच नाही. त्यांची लोकप्रियता आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेला दांडगा जनसंर्पकामुळे पिंपरी चिंचवड शहराचे कारभारी म्हणून ते काम पाहू लागले. सलग पंधरा वर्ष महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता त्यांनी अबाधित ठेवली. त्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट झाला. शहरातील सुसज्ज रस्ते, उड्डाणपुल, पाणी पुरवठा योजना, उद्याने, क्रीडागंणाची आदी विकास कामे त्यांनी केली. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यात शहराचे पुर्वाश्रमीचे कारभारी अजित पवारांचा मोलाचा हात आहे.

दरम्यान, सध्या मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटा-तटात विभागला आहे. मावळात राष्ट्रवादीची ताकद असूनही शिवसेनेचाच खासदार निवडून येत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतील गट-तट एकत्रित करण्यासाठी राष्ट्रवादीकडून संभाव्य उमेदवार म्हणून पार्थ पवारांचे नाव जोरदार चर्चेले जात आहे. त्यातच पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदार संघातून विविध कार्यक्रम, कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी घेवून मतदार संघात जनसंपर्क वाढवू लागले आहेत. पार्थ पवारांच्या राजकीय कारर्किदीची मुहूतमेढ मावळातून रोवली जात आहे. त्यासाठी जोरदार मोर्चबांधणी सुरु आहे.

त्यामुळे वडील अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात केलेली विकास कामे आणि शहराची अंर्तगत ओळख व्हावी म्हणून पार्थ पवार हे शहरात फेरफटका मारु लागले आहेत. त्यांनी सोमवारी (दि.११) शहरातील विविध ठिकाणी पाहणी केली. पिंपरीतील डी.वाय.पाटील अंभियांत्रिकी महाविद्यालयाशेजारी चहाचा अस्वाद घेवून तेथील विद्यार्थ्यांची संवाद साधला. शहराची माहिती त्यांच्याकडून जाणून घेत विकास कामांबाबत माहिती त्यांनी विचारली. त्यावर विद्यार्थ्यांनी त्यांची मनमोकळे पणाने संवाद साधला. त्यांच्या या पाहणी दौऱ्यामुळे मावळमधून पार्थ पवार निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.

Review