बेरोजगारीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने;आकुर्डीतील तहसील कार्यालयासमोर आंदोलन

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- वाढत्या बेरोजगारीच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने आज (बुधवारी) आकुर्डीतील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक नाना काटे, मयुर कलाटे, राजू बनसोडे, राहुल भोसले, निलेश पांढारकर, नगरसेविका संगीता ताम्हाणे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, प्रदेश संघटक विशाल काळभोर, गंगा धेंडे, पुष्पा शेळके, मनीषा गटकळ, पल्लवी पांढरे, आनंदा यादव आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

Review