'वर्ल्ड कप'२०१९ - कोहलीला विश्वकरंडकासाठी धोनीची अनुभवाची गरज; श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा याचे मत

नवी दिल्ली,(सह्याद्री बुलेटीन) गेल्या वर्षात फलंदाजीमध्ये अपयश आलेल्या धोनी विश्वकरंडक सुरु होणार असे म्हणताच यंदाच्या वर्षात जोरदार फॉर्मात आला. त्यामुळेच कर्णधार विराट कोहलीला विश्वकरंडकासाठी धोनीची अनुभवाची सर्वाधिक गरज असल्याचे मत श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा याने व्यक्त केले आहे.

''धोनीला संघातील त्याच्या स्थानाबद्दल पूर्ण जाणीव आहे. त्याला खूप चांगल्या प्रकारे माणसं ओळखता येतात. त्याला ड्रेसिंगरुममधील अडचणींचा सामना कसा करायचा याचे चांगले ज्ञान आहे,'' अशा शब्दांत संगकाराने धोनीचे कौतुक केले आहे.

विश्वकरंडकासाठी त्याचा अनुभव हा कोहलीसाठी हुकमी एक्का असणार आहे असे मतही त्याने यावेळी उपस्थित केले. तो म्हणाला, ''विश्वकरंडकासाठी अनुभव सर्वाधिक महत्वाचा आहे आणि त्यामुळेच धोनीला 15 खेळाडूंच्या संघात स्थान मिळणार हे नक्की. विश्वकरंडकातील सामन्यांमध्ये दडपण आल्यास कोहलीला मैदानात धाव घेण्यासाठी धोनीची गरज भासणार आहे.''

Review