व्हॅलेंटाइन डे : भाजप-शिवसेना यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? धनंजय मुंडेंचा टोला
मुंबई,(सह्याद्री बुलेटीन)-आजचा दिवस हा व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा करतो. प्रत्येकजण आपापल्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. मात्र विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोपरखळी मारली आहे. धनंजय मुंडे यांनी दोघांचा एक फोटो ट्विट करत यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? असा प्रश्न विचारत टोला मारला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? गेली पाच वर्षे रोज कितीही भांडले तरी पुन्हा एकत्रच… केवढा तो एकमेकांवर जीव… नाही का?’ ट्विटमध्ये त्यांनी व्हॅलेंटाइन डेचा हॅशटॅगही दिला आहे.