अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार पणामुळेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला उतरती कळा,
(प्रदीप म्हस्के)
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)-आज शहरातील एक जेष्ठ नागरिक कुत्रा चावल्याची लस घेण्यासाठी पालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे गेले असता त्यांना लस संपली आहे, बाहेरून घेवून या असे सांगण्यात आले... या प्रकाराबद्दल वैद्यकीय अधिकारी डॉ. पंडित यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता,त्यांच्याशी झालेल्या संभाषणात ते म्हणाले "पालिकेच्या व शासकीय सर्वच रुग्णालये व दवाखाने यांमध्ये ही लस मोफत उपलब्ध करून देण्याची शासकीय तरतूद असून, आपणही ती मोफत उपलब्ध करून देतो,( अपवाद:पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या काही दवाखान्यांमध्ये थेट वाय. सी. एम. ला लस घ्यायला जाण्याचा सल्ला दिला जातो.) परंतु या वेळेला थोडा गोंधळ झाला,आता आपण ऑर्डर दिलेली आहे त्यामुळे लवकरच आपण ती उपलब्ध करून देवू,आपल्या रुग्णालयामध्ये दोन, तीन औषधांच्या बाबतीत असा तुडवडा असून आज आणखी एका विभागातून एक तज्ज्ञ ही समस्या घेवून माझ्याकडे आले होते, त्यानुसार मी आदेश दिले आहेत" असे ते म्हणाले.
औषधांच्या पुरावठया बाबत ते संपण्याच्या आता आपण व्यवस्था करत नाही का? असे विचारले असता, ते म्हणाले, "आपल्याकडे ठरलेले असते की कोणत्या औषधांचा किती स्टॉक आहे आणि तो किती राहिल्यानंतर पुढची ऑर्डर द्यायची, या सगळ्या गोष्टींसाठी एक कोल्ड चैन नियंत्रित करायची असते पण या वेळेस ते शक्य झाले नाही, हे जिल्ह्यामध्ये कुठेही होते, मग रुग्णांना आपण दुसऱ्या शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला देतो,औषध निर्मात्यांना आपण आदेश दिलेला असून या वेळेला केलेल्या हलगर्जीपणाबद्दल मी त्यांना मेमो बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले हा हलगर्जीपणा हाताखालच्यानी व्यवस्तीत काम न केल्याने होतो." असे त्यांचे मत होते, "या बाबत आष्टीकर साहेबांना सांगण्याचा प्रयत्न केला असता ते रजेवर होते,पण ते लवकरच या प्रकारांबद्दल आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण रुग्णालयाला औषध पुरवठा कोण करते? असे विचारले असता,पालिकेचे मध्यवर्ती औषध भांडार असून आपण आपल्या मागणीनुसार त्यांना पुरवठा करण्यास सांगतो मग मध्यवर्ती औषध भांडाराचा खरेदी विभाग व पालिकेचा वैदयीक औषधांची खरेदी करतो, आजच्या पुरवठ्याच्या कमतरतेबद्दल दोष कोणाला देणार?असे विचारले असता यशवंतराव चव्हाण रुग्णालय पदवित्त संस्था म्हणून नुकतेच विलग झाले असून औषध खरेदी संस्थेकडे आल्या नंतर हे दोष राहणार नाहीत, या बाबत व इतरही काही बाबतीत आयुक्त हर्डीकरांची भेट घेवून त्यांना याबाबत सांगणार आहे, आज आष्टीकर रजेवर असल्यामुळे अडचण झाली अशी कबुली शेवटी त्यांनी दिली,डॉ. पंडित प्रवासात असल्यामुळे व नेटवर्क खराब असल्यामुळे त्यांच्याशी पुढील वार्तालाप होवू शकला नाही, परंतु पूर्ण संभाषना दरम्यान रुग्णांना आज झालेल्या गैरसोयीबद्दल त्यांनी एक चकार शब्द ही काढला नाही.
एकंदर या एका छोट्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचा जो कारभार डबघाईला आलेला आहे, त्यास एक महत्त्वाचं कारण म्हणजे अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा तो दूर करण्याऐवजी सोपा पर्याय स्वीकारण्याचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रयत्न असतो त्याचे उत्तम उदाहाराण म्हणजे भोसरी येथील पालिकेच्या रुग्णालय खासगीकरनाच्या
ठरावाला पालिकेच्या सर्वसाधारण सभेने दिलेली मंजुरी यात सर्व साधारण जनतेचा विचार करतो कोण?असा प्रश्न मात्र उपस्तीत होतो...