”खून के बदले खून हो” शहीद जवानांच्या पत्नीची मागणी

गुजरात,(सह्याद्री बुलेटीन) – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील गोरीपोरा भागात केंद्रीय राखीव सुरक्षआ दलाच्या (सीआरपीएफ) एका तुकडीवर भीषण दहशतवादी हल्ला झाला. या भीषण हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे.

जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात गुजरात येथील देवरियामधील जवानालाही वीरमरण आलंय. सीआरपीएफ जवान विजय कुमार मौर्य हे पुलवामा हल्ल्यात शहीद झाले. या घटनेबाबत कुटूंबियांना माहिती होताच शहीद जवानांच्या पत्नी विजय लक्ष्मी आक्रोशीत झाल्या आहे.

या घटनेनंतर वृत्तसंस्थाने हल्ल्यात शहीद झालेले सीआरपीएफचे जवान विजय कुमार मौर्य यांच्या पत्नी विजय लक्ष्मी यांना संदर्भात प्रतिक्रिया विचारली अक्रोशीत होऊन प्रतिक्रिया दिली कि,”पाकिस्तानला या दहशतवादी हल्ल्याबाबत लवकरात लवकर धडा शिकवला पाहिजे. पाकिस्तान विरोधात सरकारला कठोर निर्णय घ्यायला पाहिजे, खून के बदले खून हो.” तसेच वडिलांनी मुलाबाबत गर्व होत असल्याचे सांगितले मात्र दहशतवादी हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली कि, या पूर्वीसुद्धा असे हल्ले झाले आणि कित्येक जवानालाही वीरमरण आलंय. मात्र या ”दहशतवादी हल्ल्याबाबत कठोर असे निर्णय घेण्यात आले नाही यावर लवकरात लवकर कठोर निर्णय घेण्यात यावे”अशी मागणी केली आहे.

 

Review