PulwamaAttack : शिवसेनेने पाकिस्तानचा झेंडा जाळून केला;दहशतवादी हल्ल्याचा निषेध

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- पुलवामा येथे तब्बल 350 किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्याने गुरुवारी सीआरपीएफच्या ताफ्यावर चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात 39 जवान शहीद झाले. या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेने पाकिस्तानचा झेंडा जाळून या घटनेचा निषेध केला.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर, नगरसेवक सचिन भोसले, माजी नगरसेवक मधुकर बाबर, रोमी संधू, युवराज कोकाटे उपस्थित होते. यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

पुलवामा येथे तब्बल 350 किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्यानी गुरुवारी (दि. 14)सीआरपीएफच्या ताफ्यावर चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात 39 जवान शहीद झाले. या भ्याड या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वत्र पाकिस्तनाचा निषेध करण्यात येत आहे. पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी केली जात आहे.

मोशीतील शिवाजी चौकात भोसरी विधानसभेच्या वतीने शिवसेना शिरुर जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा झेंडा जाळून हल्ल्याचा निषेध करण्यात आला. शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

महिला आघाडी संघटिका वेदश्री काळे, युवासेना प्रमुख सचिन सानप, शशिकला उभे, आशा भालेकर, परशुराम आल्हाट, रुपाली आल्हाट, जनाबाई गोरे, सतीश मरळ, गणेश इंगवले, आबा लांडगे, अमित शिंदे, नंदा दाटकर, स्मिता मोगरे, पुष्पा मुचुनडीकर, राजश्री पाटील, संकेत चिवटे, सुजाता आल्हाट, कल्पना आल्हाट, मयूर कुदळे संतोष बो-हाटे, सुभाष महाजन, विश्वनाथ टेमगिरे, वैभव गिरी, आकाश आल्हाट, गणेश आल्हाट, मनोज आल्हाट, अनिकेत आल्हाट उपस्थित होते. यावेळी 'पाकिस्तान मुर्दाबाद' यासह पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

Review