राष्ट्रवादी श्रमिक कामगार संघटनेच्या प्रदेश महिला अध्यक्षपदी मिना मोहिते यांची नेमणूक

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्वभूमीवर पक्षाची मोर्चेबांधणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिका-यांच्या नेमणुका करण्यात येत आहेत. महत्वाच्या पदांपैकी राष्ट्रवादी श्रमिक कामगार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष पदी पिंपरी-चिंचवडमधील मिना श्रीरंग मोहिते यांची नेमणूक करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी असंघटीत कामगार संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदावर राहून मिना मोहिते यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली होती. त्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर उच्च पदाची जबाबदारी दिली आहे. या पदावर राहून त्यांना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षवाढीसाठी प्रयत्न कराचे आहेत. पक्षाचे संघटन वाढवून येणा-या निवडणुकांना सामोरे जाण्याच्या सूचना प्रदेश कार्यकारिणीने दिल्या आहेत.

Review