पुणे महापालिका स्थायी समितीसाठी आठ नवीन सदस्यांची नियुक्ती

पुणे,(सह्याद्री बुलेटीन)- महापालिका मुख्यसभेत गुरूवारी स्थायी समितीतील आठ जागांसाठी निवड झाली. भाजपकडून पुन्हा एकदा सुनील कांबळे यांना सदस्यत्व देण्यात आले असून, आरपीआय च्या हिमाली कांबळे यांना सदस्यत्व देण्यात आले आहे. याशिवाय हेमंत रासने, दीपक पोटे, प्रकाश ढोरे आणि राजेंद्र शिळीमकर या सहा सदस्यांची निवड करण्यात आली. तर राष्ट्रवादीकडून महेंद्र पठारे आणि अशोक कांबळे या दोघांची नावे ‘फायनल ‘ करण्यात आली. ही सर्व नावे एकमताने मंजूर झाली.

भाजपचे सुनील कांबळे, मंजुषा नागपुरे, निलिमा खाडे, कविता वैरागे, राजा बराटे आणि आबा तुपे या सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यांच्या जागेवरील सहा सदस्यांची नियुक्ती झाली. यातील एक जागा आरपीआयला देण्यात आली असून आरपीआय तर्फे हिमाली कांबळे यांना संधी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान गटनेते दिलीप बराटे आणि आनंद अलकुंटे यांचा कार्यकाळ संपल्याने अशोक कांबळे आणि महेंद्र पठारे यांची नावे समितीसाठी मुख्यसभेत जाहीर करण्यात आली.

Review