पुणे विद्यापीठात सलग दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण
पुणे,(सह्याद्री बुलेटीन)-संशोधक विद्यार्थी समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. दिनांक 8/2/2019 पासुन संशोधक विद्यार्थी विद्यावेतनासाठी आदोंलन करत असून आदोंलनाचा आज 14 वा दिवस आहे. विद्यापीठ प्रशासनाने आदोंलक संशोधक विद्यार्थी कोणतीही दखल न घेतल्यामुळे 20/2/2019 तारखे संशोधक विद्यार्थी आमरन उपोषणाला बसले असुन आमरन उपोषणालचा आज 2 रा दिवस आहे.
संशोधक विद्यार्थी समितीला सर्वच विद्यार्थी संघटना पाठिबां दिला आसुन दिनाक 22/02/2019, रोजी विद्यापीठातील विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला बदांची हाक दिली आहे.
या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठतील सर्व विद्यार्थी संगठनांची कुलगूरूनीं 4 वाजता बैठक बोलावली आहे. अद्याप आंदोलनकारी विद्यार्थ्यांशी कुठलीही चर्चा केली गेली नाही.