पाकिस्तानचे पाणी अडवले आता पाकिस्तानलाच कायमचे अडवा – रामदास आठवले

मुंबई,(सह्याद्री बुलेटीन)- भारताच्या नद्यांचे पाकिस्तानात जाणारे पाणी अडवून पाकिस्तानची पाणीकोंडी करण्याचा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. पाकिस्तानचे पाणी अडवले आता दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट, व्यापार, व्यवहार सर्व क्षेत्रात संबंध तोडून आरपारची लढाई लढून पाकिस्तानला कायमचे अडविले पाहिजे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

पाकिस्तान भारतचे पाणी पिऊन भारताशी बेईमानी करीत आहे.भारतात दहशतवाद पसरवून दहशतवादी कारवाया करून भारतीयांचे रक्त सांडविणऱ्या पाकिस्तानला कायमचा धडा शीकविला पाहिजे. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया थांबविण्यासाठी पाकिस्तानला अडविले पाहिजे आणि युद्ध करून कायमचे आडवे केले पाहिजे असे ना रामदास आठवले म्हणाले.

Review