पुणे:मूकबधिरांच्या मोर्चावर पोलिसांनी केला लाठीचार्ज
पुणे,(सह्याद्री बुलेट)-पोलिसांनी कर्णबधिरांच्या मोर्चावर लाठीचार्ज केल्याची घटना पुण्यात घडली आहे. कर्णबधिरांकडून पुण्यातील समाज कल्याण कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. पण पोलिसांकडून मोर्चा अडवण्यात आला आणि त्यांच्यावर लाठीचार्जला सुरुवात केली. शिवाय 60 ते 70 तरुणांना ताब्यातही घेण्यात आलंय.
पुण्यातील समाज कल्याण कार्यालयात जाऊन हे तरुण आणि तरुणी त्यांच्या मागण्या मांडणार होते. त्यानंतर मंत्रालयात येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचं पत्र दिलं जाणार होतं. त्याअगोदरच पोलिसांनी अडवणूक करत या दिव्यांगांवर अमानुषपणे लाठीचार्च केलाय. या मारहाणीमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत