राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ; विरोधकांचा राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार
मुंबई,(सह्याद्री बुलेटीन)– राज्याचे राज्यपाल विधानभवनात पोहोचताच विरोधीपक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली. महात्मा गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या तेव्हा राज्यपालांनी आरएसएसचे समर्थन केले होते. म्हणून विरोधीपक्षांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला आहे..
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय ्अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभआषणावर बहिष्कार घातला आहे. तसेच विधानभवनात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली.
“राज्यपालांच्या अभिभाषणात कोणतेही सामर्थ्य नव्हते. पद घेतानाच राज्यपालांकडून आरएसएसचे समर्थन होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. राज्यपालांच्या अशा सामर्थ्यहीन भाषणातून जनतेची फसवणूक झाल्याचे मतही पाटील यांनी मांडले” .
“राज्यपाल हे पद घटनात्मक असतांना त्यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे अशी भूमिका घेतली आहे.आजचे त्यांचे अभिभाषण हे राज्यपाल म्हणून राज्याच्या हिताचे असेल की संघाचा कार्यकर्ता म्हणून संघाचा अजेंडा राबवणारे ? याबाबत शंका असल्याने आम्ही अभिभाषणावर बहिष्कार घालत आहोत”, असं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.
तर आव्हाड यांनी याबदल प्रतिक्रिया देत सरकारवर टीका केली आहे. राज्यपाल हे सरकारच्या वतीने ‘माझे सरकार हे करणार आहे,’ असे अभिभाषणात सांगतात. परंतु यांच्या सरकारने आजवरच्या अधिवेशनात सांगितलेली एकही गोष्ट केलेली नाही, उलट असहिष्णुतेचे वातावरण पसरवले, असा आरोप आ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.