भारताला चर्चेचं निमंत्रण ?

दिल्ली ( सह्याद्री बुलेटिन ) - भारतीय हवाई दलाने हल्ला केल्यानंतर युद्धाची भाषा करणारं पाकिस्तान नरमलं आहे. पाकिस्तान सैन्याकडून भारताला चर्चेचं निमंत्रण देण्यात आलं आहे. अशी माहिती समोर येत आहे

मंगळवारी बालकोट येथे भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला धमकी दिली होती. भारताला योग्य वेळी प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. या तीन विमानांना भारतीय हवाई दलाने पिटाळून लावले. यातील एक विमान भारताने पाडले असून पाक हवाई दलाच्या ताफ्यातील एफ १६ विमान पाडण्यात यश आले आहे. या दरम्यान भारतीय वैमानिकही बेपत्ता झाला आहे, या सर्व पाश्वभूमीवर यौद्धाचे ढग दिसू लागले आहेत हे कोणत्याही देशाच्या हिताचे नाहीत. यासाठी पाकिस्तान सैन्याकडून भारताला चर्चेचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

Review