पाकिस्तानवर हल्ला केला आता फायदा भाजपलाच - कर्नाटकी येडा आप्पा

(सह्याद्री बुलेटिन ) - राजकारण करताना कोणतेही भान न ठेवता केवळ स्वार्थ पाहणाऱ्या राजकारण्यांची आपल्याकडे कमी नाही, यातच आता भर पडली आहे भाजपा नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची. त्यांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याचा भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत फायदा होईल असे मत व्यक्त केले आहे. भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचा भाजपाला लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात २२ हून अधिक जागा जिंकण्यासाठी फायदा होईल असं येडियुरप्पा म्हणाले आहेत.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या नेत्यामुळे पाकिस्तानला भारताने धडा शिकवला आहे. मागील चाळीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं आहे’, ‘भारताचे ४२ जवान शहीद झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी प्रत्येक जवानाच्या बलिदानाचा बदला घेतला जाईल असं मत व्यक्त केलं होतं. हवाई हल्ला करुन त्यांनी त्यांचे वचन पाळले’, असं मतही येडियुरप्पांनी व्यक्त केल्याचे ‘द न्यूज मिनिट’ने म्हटले आहे.

या हवाई हल्ल्यांचा भाजपाला फायदा होईल, देशामध्ये मोदी समर्थनाची लाट असून देशातील राजकीय हवा भाजपाच्या बाजूनेच वाहत आहे असंही येडियुरप्पा म्हणाले आहेत. या हल्ल्यामुळे पक्षाला राज्यात २२ हून अधिक जागा जिंकण्यास मदत होईल,’ असं मत येडियुरप्पांनी व्यक्त केले आहे.

Review