पाकिस्तान शांतताप्रिय देश - शाहिद आफ्रिदीचा शांतीचा जप

मुंबई : 'शत्रूलाही आदराने वागवणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचा मला अभिमान आहे. भारताने सुरू केलेले हे युद्ध थांबवावे. आमचा देश शांतताप्रिय आहे असा शांतीचा जप पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने सुरु केला आहे.
भारतीय सैन्याच्या पलटवाराची धास्ती घेतली आहे. भारतीय हवाई दलाच्या एअर सर्जिकल स्ट्राईकमुळे घाबरलेला आफ्रिदी शांततेची भाषा करू लागला आहे.
भारतीय हवाई दलाने घरात घुसून पाकिस्तानला धडा शिकवला.
भारतीय हवाई दलाचे एक विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळले आणि त्यातील जवान पाकिस्तानच्या हद्दीत गेला. त्या भारतीय जवानाला पाकिस्तान सैन्याने अटक केली आहे आणि त्याचा एक व्हिडीओ पाकिस्तान सैन्याने बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यात पाकिस्तानी सैन्य शत्रूलाही कसे आदराने वागवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. आफ्रिदीनेही हा व्हिडीओ पोस्ट करून भारताने युद्ध थांबवावे असे सांगितले आहे. तो म्हणाला,''शत्रूलाही आदराने वागवणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचा मला अभिमान आहे. भारताने सुरू केलेले हे युद्ध थांबवावे. आमचा देश शांतताप्रिय आहे आणि चर्चेतून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो.''

Review