राज ठाकरे आता राष्ट्रीय सल्लागाराच्या भूमिकेत - पाकिस्तानशी चर्चा करण्याचा दिला सल्ला

मुंबई ( सह्याद्री बुलेटिन ) - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महत्वपूर्ण भूमिका बजावत असून त्यांनी भारताला पाकिस्तानशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे,
भारतीय वायूसेनेने बुधवारी भारतीय हद्दीत घुसलेली पाकिस्तानची विमाने पिटाळून लावल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला चर्चेचे निमंत्रण दिले आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानशी चर्चा करण्याची संधी सोडू नये, असे आवाहन केले आहे. पाकिस्तानची खरंच चर्चेची तयारी असेल तर त्यासाठी पहिलं पाऊल हे त्यांनीच उचलायला हवं. त्यांनी वैमानिक अभिनंदन यांना तात्काळ सोडलं पाहिजे आणि सीमारेषेवरचा गोळीबार त्वरीत थांबलाच पाहजे. जर या गोष्टी घडल्या तरच म्हणता येईल इम्रान खान यांचे हेतू स्वच्छ आहेत आणि तसं घडलं तर पंतप्रधान मोदींनी ही संधी गमावता कामा नये असे राज ठाकरे यांनी गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे.

Review