मोदी सरकारच्या प्रभावामुळेच अभिनंदन यांची सुखरूप सुटका – अमित शहा
अहमदाबाद,(सह्याद्री बुलेटीन) – नरेंद्र मोदी सरकारच्या प्रभावामुळे अभिनंदन लवकर मायभूमीत परत आला.असा दावा भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका रॅलीच्या भाषणादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले.
अमित शहा म्हणाले कि, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वांनाच वाटले होते कि सर्जिकल स्ट्राईक होणार नाही. पण काय झाले? पुलवामा हल्ल्यानंतर १३व्या दिवशी मोदी सरकारच्या एअर स्ट्राईकमध्ये २५० पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेले. तसेच जेव्हा विंग कमांडर अभिनंदन यांना पकडले तर लोकांनी टीका करण्यास सुरुवात केली. परंतु, युद्ध असल्याने एक जवान पकडला जाऊ शकतो. शहा पुढे म्हणाले कि, नरेंद्र मोदी सरकारच्या प्रभावामुळे अभिनंदन लवकर मायभूमीत परत आला, असेही त्यांनी सांगितले.