इम्रान खानचे कौतुक आणि मोदींवर टीका, दिग्विजय सिंग यांनी मागितले सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे...

इंदोर (सह्याद्री बुलेटिन ) - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका केल्याबदद्ल कौतुक करत, शनिवारी इंदोरमध्ये बोलताना काँग्रेसचे दिग्विजय सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सर्जिकल स्ट्राईक चे पुरावे मागितले आहेत.
इम्रान खान यांनी चांगले शेजारी असण्याचा नवा मार्ग दाखवला आणि आमचा शूर अधिकारी आम्हाला परत केला. आता त्यांनी अजून थोडी हिंमत दाखवावी आणि हाफिज सईद आणि मसूद अजहर यांसारख्या कुख्यात दहशतवाद्यांनाही भारताच्या हवाली करावं असंही सिंह म्हणाले.
सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. त्यामुळे उपग्रहाद्वारे छायाचित्रे शक्य आहेत. ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतर अमेरिकेने जगासमोर त्याच्या खात्म्याबाबतचे भक्कम पुरावे सादर केले होते. भारतानेही एअर स्ट्राइकचे पुरावे जगासमोर सादर करावेत असं सिंह म्हणाले.

 

Review