महात्मा फुले महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय, विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या ठिकाणी करण्यात आले. प्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात आपल्या उद्घाटनपर भाषणात सबइन्स्पेक्टर बटालियन – ०५ एन.डी.आर.एफ. चे श्रीराम धन गुर्जर म्हणाले की, “देशात वेळोवेळी नैसर्गिक मानवनिर्मित आपत्तीच्या घटना घडत असतात. अशा प्रसंगी तातडीने बचावकार्य सुरू करणे या व्यापक हेतूने केंद्र सरकारने आपत्ति व्यवस्थापन कायदा-२००५ व राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरण स्थापन केले” ‘सज्ज समाज सुरक्षित सामाज या बोधवाक्यानुसार प्राधिकरणाचे कामकाज चालते. समाजाला या आपत्ती व्यवस्थापन संस्थांची माहिती होऊन त्यांनीसुद्धा या कार्यात प्रशिक्षण घेऊन आवश्यक ते सहकार्याव केले पाहिजे” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


रामधन गुर्जर अधिकारी बटालियन – ०५ एन.डी.आर.एफ. व त्यांचे सहकारी श्री. उत्तम लोकरे, श्री. डी.पी. तिवारी श्री. देवीदास गीते, श्री पलाश दास व श्री. संजय पडवळ यांनी यावेळी दिवसभरात प्रबाधित स्थळावरील मदत भूकंप ग्रस्त भागातील मदत अपघातकालीन स्थितीतील घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. हृदयविकार प्रथोंपचाराची प्रात्यक्षिके करून दाखविली. कार्यशाळेच्या दुसार्याा दिवशी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी डॉ. जयवंत श्रीखंडे यांनी आपल्या व्याख्यानात आपत्कालीन वैद्यकीय उपचार कसे करायचे. तसेच हृदय विकाराच्या वेळेत व हायवे रोडवरील अपघातग्रस्थांना उचलण्यापासून ते हॉस्पिटलपर्यंत घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे समन्वयक श्री. ओमप्रकाश बहिवाल यांनी नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती इ. आपत्तीचे प्रकार सांगून प्रत्यक्ष आपत्ती व्यवस्थापन कसे करावे यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड आपल्या मार्गदर्शन पद भाषणात म्हणाले कि, “ आपत्ती हि कधीही सांगून येत नाही. तिला प्रसंगावधानाने तोंड देणे गरजेचे असते. शासनाच्या मदतीची वात न पाहता देशातील नागरिकांनी विशेषतः विद्यार्थी वर्गांनी यावेळी सगज राहून मदतकार्य करणे अपेक्षित आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपत्ती व्यवस्थापन समिती प्रमुख प्रा. उद्धव घोडके यांनी केले तर, पाहुण्यांचा परिचय प्रा. संदीप नन्नावरे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रा. बाबासाहेब पवळ यांनी मानले, तर सूत्रसंचालन डॉ. सोनाल बावकर व डॉ. प्रतिमा कदम यांनी केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. मृणालिनी शेखर, प्रा. सुनील सालके, प्रा. इसाक शेख, प्रा. विठ्ठल शिंदे व बहुसंख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.