महात्मा फुले महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन संपन्न

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन) मा. शिक्षण संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र शासन यांच्या परिपत्रकानुसार रयात शिक्षण संस्थेच्या येथील महात्मा फुले महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला. २७ फेब्रुवारी हा दिवस कविवर्य कुसुमाग्रज तथा विष्णु वामन शिरवाडकर यांचा जन्म दिवस. मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी, कवि व गीतकार ग.दि. माडगूळकर प्रसिद्ध विनोदी लेखक पू.ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष तसेच नाटककार कवि व विनोदी लेखक राम गणेश गडकरी स्मृतीशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हा दिवास साजरा करण्यात आला.
शासन परिपत्रकानुसार
“चला मराठी ‘म्हण’ जपू या ! मराठीचे ‘धन’ जपू या !
“चला मराठी ‘म्हण’ जपू या ! मराठीचे ‘मन’ जपू या !
या काव्यपंक्तिनुसार विद्यार्थ्यांमध्ये मराठीतील म्हणींच्या जतन व संवर्धनासाठी जागृती करण्यात आली. या निमित्ताने श्री बाबासाहेब खराडे (केंद्रप्रमुख, आकाशवाणी केंद्र, अहमदनगर) यांचे मराठी भाषा ही प्राचीनात्मकभाषा असून संतांचे साहित्य, पंडितांचे साहित्य व शाहीरांच्या साहित्याने समृद्ध झालेली आहे. आजच्या काळातही कवी केशवसुतांपासून कुसुमाग्रजांपर्यंत ती विकसित होत आहे. ‘अमृताचे बोल बोलणार्याु मराठी भाषेचा गौरव करताना आपण तिचे संवर्धन केले पाहिजे.” यावेळी खराडे यांनी चारोळया, हासी कविता, विडंबन काव्य, विनोद सादर करून उपस्थितांना मन मुराद हसविले. यानंतर व्यासपीठावर झालेल्या उत्स्फूर्त काव्यवाचनात अवधूत कुलकर्णी, कु. शोभा पांडागळे, किशोर अककी , कु. आकांक्षा कुंजिर, कु. काजोल शिंदे , विनोद भाकरे या विद्यार्थी कवींनी आपल्या कविता सादर केल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी मार्गदर्शनात म्हणाले की, “मराठी ही आपली मातृभाषा आहे. संगणक व तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषेचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे तरच मराठी संस्कृती काळाच्या ओघात टिकून राहील.”


या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय मेस्त्री यांनी साहित्यिक पू.ल. देशपांडे , ग.दि. माडगूळकर व राम गणेश गडकरी यांच्या साहित्याचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाचे आभार प्रा. विद्यासागर वाघेरे ब सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र बावळे यांनी केले. यावेळी कला शाखेच्या उपप्राचार्या मृणालिनी शेखर, प्रा. सुनील सालके, प्रा.विठ्ठल शिंदे, प्रा. इसाक शेख इ. प्राध्यापक व बहुसंख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

 

Review