हिंजवडीत एक्स ओ झिरो हॉटेलमध्ये हुक्का पार्लवर वाकड पोलिसांनी छापा; 40 हजारांचा ऐवज जप्त
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन) - हिंजवडी येथील एक्स ओ झिरो हॉटेलमध्ये चालणा-या हुक्का पार्लरवर वाकड पोलिसांनी छापा टाकला. त्यात पोलिसांनी 40 हजार 400 रुपयांचे हुक्का साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 2) रात्री नऊच्या सुमारास करण्यात आली.
दिनेश हरीश मूलचंदानी, नागेश रामकृत विश्वकर्मा (वय 27, रा नेहरूनगर, पिंपरी), आकाश विजय सोभानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्य्क पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांना माहिती मिळाली की, पाषाण सुस रस्त्यावर सुसगाव येथील हॉटेल एक्स ओ झिरो मध्ये बेकायदेशीर हुक्का पार्लर सुरु आहे. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईमध्ये पोलिसांनी 38 हुक्का पॉट व वेगवेगळ्या फ्लेवरच्या तंबाखू असा एकूण 40 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.