वाको महाराष्ट्र प्रदेश चेअरमन पदी संतोष बारणे यांची नियुक्ती
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)-पिंपरी चिंचवडचे सिल्वर ग्रुपचे संचालक व प्रसिध्द सामाजिक कार्यर्ते संतोष बारणे यांची अम्युचर स्पोर्टस किकबॉक्सिंग असोसिऐशन वाकोच्या महाराष्ट्र चेअरमनपदी नुकताच निवड करण्यात आली आहे. पुण्यात झालेल्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. बारणे यांना संघठनेचे महाराष्ट्र अध्यक्ष संतोष म्हात्रे यांच्या हास्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
जगातील एकशे 88 देशात वाको-किंकबॉक्सिंग हा खेळ खेळला जातो. या खेळाला व संघटनेला जागतीक ऑलम्पिंक महासंघाची देखील परवानगी असून भारत देशाबरोबरच महाराष्ट्रात देखील या खेळाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. देशात 26 राज्याबरोबरच महाराष्ट्रात देखील या खेळामध्ये अऩेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवली आहेत. बारणे यांच्या नवडीमुळे राज्यात देखील या खेळाचा नियोजन बध्द प्रसार होण्यास मदत मिळणार असल्याचे संघटनेचे म्हात्रे यांनी सांगितले. बारणे यावेळी बोलताना म्हणालेकी, साधारण भारतातील 18 ते 20 लाख खेळाडू व महाराष्ट्रातील 75 हजार च्या वर खेळाडू या असोसिएशन तर्फे खेळत आहेत. निश्चितपणे या खेळाला व खेळाडूंना सर्वोतपरी मदत करण्यासाठी आम्ही कटीबध्द राहु. महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशन च्या चेअरमन पदि माझी निवड केली याचा मला सार्थ अभिमान आहे. या कार्यक्रमावेळी संघठनेचे सचिव प्रविण काळे राज्यातील सर्व पदाधिकारी व जिल्हा प्रतिनिधी हजर होते.