महाशिवरात्रीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुंभमेळ्यात

 मुंबई,(सह्याद्री बुलेटीन)–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर प्रयागराजमधील कुंभमेळ्यात पवित्रस्नान केले. यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि फिल्मसिटीचे उपाध्यक्ष अमरजीत मिश्रही यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होते.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी इन्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये स्नान केल्यानंतर फडणवीसांनी ‘हर हर महादेव’चा जयघोष केला. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकराला नमन करण्यासाठी मुख्यमंत्री कुंभमेळ्याला गेले होते. मुख्यमंत्र्यांच्या स्नानावेळी उत्साहित झालेल्या भक्तांनी ‘वंदे मातरम्’ आणि ‘मोदी-मोदी’च्या घोषणा दिल्या. हा विशाल कुंभमेळा भव्य-दिव्य, स्वच्छ आणि पावित्र्याने आयोजित केल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Review